¡Sorpréndeme!

Latest Bollywood Update | A. R. Rahman झाले इथले ब्रँड अँबेसेडर | Lokmat News

2021-09-13 28 Dailymotion

सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान याची सिक्कीमच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सिक्कीम सरकारनं दिलेल्या या बहुमानाचं रेहमाननं स्वागत केलं आहे.'द रेड पांडा विंटर कार्निवल २०१८' या सोहळ्यात मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांनी ही घोषणा केली. सिक्कीमची विविध वैशिष्ट्य जगापुढं आणून राज्यात पर्यटन वाढीला चालना देणं हा यामागचा उद्देश आहे. रेहमाननं या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. 'सिक्कीमच्या संस्कृतीनं मला प्रभावित केलं आहे. केवळ दिसायलाच नव्हे तर सांस्कृतिकदृष्ट्याही हे राज्य सुंदर आहे. येथील सौंदर्य केवळ डोंगर-दऱ्यांमध्ये नसून येथील संस्कृतीमध्येही आहे. अशा राज्याचा चेहरा बनण्याची संधी मला मिळाली, याचा अभिमान आहे,' असं रेहमान म्हणाला.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews